एसटीमध्ये प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सूट! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय MSRTC Advance Ticket Booking

 

 

MSRTC Advance Ticket Booking:एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे.

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

 

आषाढी एकादशी व गणपती उत्सवात प्रवाशांना लाभ

 

 

येत्या आषाढी एकादशीला व गणपती उत्सवासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.

 

राज्यभरातून पंढरपूर येथे जाणाऱ्या नियमित बसेसचे आरक्षण प्रवाशांनी केल्यास त्यांना त्यांच्या तिकीट दरात 15 टक्के सवलत उद्यापासून (1 जुलै) लागू होत आहे. तथापि जादा बसेससाठी ही सवलत लागू असणार नाही.

 

 

.शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

 

त गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना देखील आगाऊ आरक्षण केल्यानंतर या तिकिटाचा लाभ घेता येऊ शकतो.

 

ई-शिवनेरीच्या प्रवाशांना लाभ

 

मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या प्रतिष्ठित इ-शिवनेरी बसमधील प्रवाशांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल.

 

आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर, npublic.msrtcors.com या एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा msrtc Bus Reservation या मोबाईल अॅप‌द्वारे तिकीट आरक्षित केल्यास त्यांना 15% सवलत प्राप्त करता येऊ शकते.

 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी एसटी महामंडळानं 15 टक्के भाडेवाढ केली होती. या भाडेवाढीचा फटका लांबपल्ल्याच्या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला होता. एसटी महामंडळाच्या या निर्णयानं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एसटीचे प्रवासी या निमित्तानं वाढतात का ते ल

 

 

 

शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!