मोठी बातमी ! महाराष्ट्रात लवकरच निवडणुकांचा बिगुल; निवडणूक आयोगाने बोलावली जिल्हाधिकाऱ्यांची बैठक Maharashtra PanchayatRaj Election 2025

 

 

 

Maharashtra PanchayatRaj Election 2025;आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकीकडे राजकीय पक्ष कामाला लागले असून दुसरीकडे राज्य निवडणूक आयोगानेही

त्यासाठीच, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने बैठकीसाठी बोलावलं आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर सर्व जिल्ह्यातील निवडणूक (Election) पूर्व परिस्थितीचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

 

 

 

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

त्याअनुशंगाने जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीसाठी काय तयारी करायची आणि काय माहिती घेऊन हजर राहायचे याबाबतही सांगण्यात आलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2025 हाच या बैठकीचा विषय असून 10 जुलै रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होणार आहे.

 

 

 

 

या निवडणुकीच्या (महानगरपालिका वगळून) पूर्वतयारीचा विभागनिहाय आढावा मा. राज्य निवडणूक आयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेणार आहेत. या बैठकीमध्ये खालील विषयांचा आढावा घेण्यात येईल, असे परिपत्रकच राज्य निवडणूक आयोगाने काढले आहे.

 

. निवडणुका घेण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था

 

2. मतदार संख्या

 

3. मतदान केंद्र

 

4. ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM)

 

5. आवश्यक मनुष्यबळ

 

6. वेळेवर उपस्थित होणारे मुद्दे

 

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सोबतच्या परिपत्रामध्ये माहिती तयार करून ती आयोगास PDF Format मध्ये ई-मेलद्वारे 9 जुलै 2025 रोजी किंवा तत्पूर्वी सादर करण्यात यावी.

 

तसेच उक्त नमूद सर्व मुद्यांसंदर्भातील माहितीसह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण व्यक्तिशः उपस्थित राहावे, ही विनंती. सदर व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक यथावकाश उपलब्ध करून देण्यात येईल,असे या परिपत्रकात सांगण्यात आले आहे.

 

 

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने उपायुक्त राजेंद्र पाटील यांनी याबाबतचे पत्र राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना लिहिले आहे. तसेच, उपरोक्त व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणाऱ्या बैठकीस आपण उपस्थित राहावे, असेही सांगण्यात आले आहे.

 

बैठकीतील महत्त्वाचा मुद्दा

 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) :-

 

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) घ्यावयाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता सद्यस्थितीत आपल्या जिल्ह्यात उपलब्ध असलेले कंट्रोल युनिट (CU), बॅलेट युनिट (BU) व मेमरी (DMM) याबाबतची अद्ययावत माहिती देण्यात यावी.

 

तसेच एका कंट्रोल युनिटवर (CU) दोन पेक्षा अधिक बॅलेट युनिट (BU) जोडणे शक्य असल्याचे विचारात घेऊन आवश्यक CU, BU व DMM ची संख्या निश्चित करण्यात यावी.

 

 

EVM (FLC) प्राथमिक स्तर तपासणी करून घेण्याचा कार्यक्रम निश्चित करावा.

 

EVM सुरक्षित ठेवण्यासाठी सद्याची व्यवस्था, त्याचा गोडावूननिहाय तपशील. तसेच नवीन EVM खरेदी करण्याचे प्रस्तावित असल्याने, त्याकरिता आवश्यक असलेली जागा निश्चित करण्यात यावी..

 

मनुष्यबळ –

 

आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे किंवा कसे? याबाबत खात्री करावी. अधिकचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्यास, संबंधित विभागातील विभागीय आयुक्त यांच्याकडे त्याकरिता मागणी सादरकरावी.

 

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

 

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!