gold at home भारतीय संस्कृतीमध्ये सोने ही केवळ धातू नाही, तर ती समृद्धी, शुभत्व आणि सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक मानली जाते. अनेक पिढ्यांपासून भारतात सोने हा सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो आणि पारंपरिक स्वरूपात पुढील पिढीकडे दिला जातो. सण, लग्न आणि शुभ प्रसंगी सोने खरेदी करणे हे आपल्या जीवनशैलीचा भाग आहे. मात्र बरेच लोक हे जाणत नाहीत की भारतात घरात किती सोने ठेवता येईल यालाही काही नियम आहेत. केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने घरात साठवता येणाऱ्या सोन्याची एक मर्यादा ठरवलेली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
केंद्र सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) घरात ठेवता येणाऱ्या सोन्याबाबत स्पष्ट नियम जाहीर केले आहेत. हे नियम व्यक्तीच्या वैवाहिक स्थितीनुसार वेगवेगळे आहेत. विवाहित महिलांना 500 ग्रॅमपर्यंत, तर अविवाहित महिलांना 250 ग्रॅम सोने घरात ठेवण्याची मुभा आहे. पुरुषांसाठी ही मर्यादा फक्त 100 ग्रॅम आहे, ते विवाहित असो वा अविवाहित. ही नियमावली केवळ अशा परिस्थितीत लागू होते जेव्हा व्यक्तीच्या कडे सोनं खरेदीचे योग्य पुरावे उपलब्ध नसतात. जर अधिक प्रमाणात सोने सापडलं आणि त्याचा वैध स्रोत दाखवता आला नाही, तर आयकर विभाग कारवाई करू शकतो. त्यामुळे सोनं ठेवताना नियमांची पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे.
जर तुमच्याकडे सोने खरेदीचे वैध कागदपत्रे असतील, तर तुम्ही नियमीत मर्यादेपेक्षा अधिक सोने बाळगू शकता. त्यासाठी खरेदीची पक्की पावती, बिल आणि व्यवहाराचा स्पष्ट पुरावा असणे आवश्यक आहे. प्रत्येक वेळेस सोने खरेदी करताना मिळणारे बिल नीट जपून ठेवावे, कारण हेच त्या सोन्याचा कायदेशीर पुरावा ठरते. ज्वेलर्सकडून खरेदी करताना सोन्याची शुद्धता, वजन आणि किंमत यांचा तपशील असलेले संपूर्ण बिल घ्यावे. घरात पिढ्यान्पिढ्या आलेले पारंपरिक सोने असेल, तर त्याचे जुने कागदही सुरक्षित ठेवावेत. डिजिटल काळात या सगळ्या कागदपत्रांच्या छायाप्रती आणि स्कॅन केलेल्या प्रती वेगवेगळ्या ठिकाणी सुरक्षित ठेवाव्यात.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा