Viral Video : समाजमाध्यमांवर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. त्यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की, ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका तरुणीचा डान्स खूप व्हायरल होत आहे, ज्यातील तिच्या डान्सचं नेटकरी भरभरून कौतुक करताना दिसत आहेत
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
सोशल मीडियावर लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण विविध गाण्यांवर डान्स करून आपली कला सादर करतो. हल्ली सोशल मीडियावर जुनी मराठी गाणीदेखील खूप चर्चेत येऊ लागली आहेत, ज्यावर लोक डान्स करताना दिसतात. त्यातील काही मोजके व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. आता असाच एक डान्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुलिवंदन पार पडलं. धुलिवंदनानिमित्त अनेकांचे मित्रपरिवारासोबत रंग खेळतानाचे, गाणी म्हणतानाचे आणि ठेका धरून नाचतानाचे असंख्य व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून आहे. ज्याच एक तरूणी होळी खेळता खेळता डान्स करताना दिसत आहे.