लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या खर्चाला मंजुरी, बहिणींच्या खात्यात 2100 रुपये होणार जमा

 

aditi sumil tatkare ladaki bahin मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं विधानसभेत 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मंजूर केल्या. यामध्ये 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली. ही रक्कम नेमकी कशासाठी मंजूर करण्यात आली हे देखील स्पष्ट झालं आहे. महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासनं दिलं होतं. राज्यातील या योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना 2100 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जुलै 2024 मध्ये सुरु करण्यात आली. या योजनेसाठी एकूण 46 हजार कोटी वर्षाकाठी लागणार होते. मात्र, योजना जुलै 2024 ते मार्च 2025 यासाठी एकूण 36 हजार कोटी लागणार होते. तशी तरतुद राज्य सरकारने केली आहे. यापैकी 17 हजार कोटी जुलै ते नोव्हेंबर वाटप करण्यात आले आहेत. उर्वरित 19 हजार कोटी शिल्लक आहेत.

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आताच्या पुरवणी मागणीत 1400 कोटी रुपयांची तरतूद मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. मात्र ही तरतूद प्रशासकीय पुर्ततेसाठी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिन्याला आता साडेतीन हजार कोटी रुपयांचं बजेट आहे. त्यामुळे डिसेंबर ते मार्चपर्यंत 14 हजार कोटी रुपये लागणार आहेत. आताची तरतूद आणि मागील बाकी मिळून 20 हजार 400 कोटी शिल्लक आहेत.

लाडकी बहीण योजना 2100 रुपये लाभार्थी यादीत नाव

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

1400 कोटी रुपयांची तरतूद ही काही प्रशासकिय पुर्तता करण्यासाठी आहे. त्यामुळे निवडणूक काळात लाडक्या बहिणीसांठी केलेल्या 2100 रुपयांच्या घोषणे संदर्भात काहीच निर्णय अद्याप झाला नसल्याच यावरुन स्पष्ट होतंय.

लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना दर महा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात रक्कम पाठवली जाते. राज्य सरकारनं जुलै ते नोव्हेंबर महिन्यांपर्यंतचे पाच हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणं 7500 रुपये दिले गेले आहेत. आता महिलांना डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महायुतीनं महिलांना दरमहा 2100 रुपये देऊ असं म्हटलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपयांच्या बाबत भाष्य केलं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात याबाबत विचार करु असं म्हटलं होतं, त्यामुळं लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा मिळण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागेल.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!