IMG 20241124 171048

लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! आता खात्यात थेट जमा होणार 2100 रुपये Aditi tatkare ..|

 

 

 

Aditi sunil tatkare निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात पक्ष आपले जाहीरनामे प्रसिध्द करत आहेत, अशातच आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा आज जाहीरनामा प्रसिध्द होत आहे. यामध्ये लाडक्या बहिणींसाठी मोठा वादा केला आहे. आता लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या रकमेत वाढ करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करणार असल्याचं जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे.

 

 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

 

पाहण्यासाठी येथे क्लिक कर

 

लाडकी बहीण योजनेचा निधी वाढवणार

जाहीरनामा प्रसिध्द करताना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, महायुती सरकार काळात जे काम केलं ते लोकांपर्यंत घेऊन चाललो आहोत. आम्ही काही बदल करणाऱ्या योजना मागच्या 4 महिन्यात केल्या आहेत. लाडकी बहीण योजना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणासाठी पैसे अशा अनेक योजना जाहीर केल्या. याला प्रचंड प्रतिसाद देखील मिळत आहे. तालुका स्तरीय देखील जाहीरनामा प्रसिद्ध करत आहोत. स्थानिक पातळीवरील जाहीरनामा यामध्ये आमदारांच काम मांडलेले असेल. आम्ही सुरू केलेल्या हेल्पलाइनला 25 लाख कॉल आले आहेत. आता आम्ही टोल फ्री नंबर सुरू करत आहोत. 9861717171 हा टोल फ्री नंबर सुरू केला आहे. यावर तालुका स्तरीय जाहीरनामा ऐकता येणार आहे. लाडकी बहीण योजेनच्या पैशात वाढ करत आहोत. ती आम्ही 2100 रुपये करणार आहोत. 2 कोटी 30 लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे.

 

 

 

लाडकी बहीण योजना लाभार्थी यादीत नाव

 

पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!