Agriculture Solar Sprayer Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी 100 टक्के अनुदानावर अर्ज सुरु, येथे करा अर्ज
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Solar Sprayer Pump: राज्यात सध्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कापूस, सोयाबीन अशा प्रमुख पिकांच्या क्षेत्रांवर पेरण्या यशस्वीरीत्या पार पडल्या असून पिके जोमात फुलत आहेत. पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्जता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर, सोलर चलित फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची हि उत्तम संधी आहे.
उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारचा पुढाकार
अर्ज कुठे आणि कसा कराल? Solar Operated Agriculture Knapsack Sprayer
१००% अनुदानावर सोलार फवारणी पंप
Solar Sprayer Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी अर्ज कसा कराल
उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारचा पुढाकार
कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या उत्पादनक्षमतेत वृद्धी घडविण्यासाठी राज्य सरकारने 2024-25 वर्षासाठी विशेष योजना सुरू केली आहे. पिकांची उत्पादकता वाढवून मूल्यसाखळी विकसित करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना सोलार वर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची mahadbt पोर्टल वर अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. अधिक माहिती हवी असल्यास नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
१००% अनुदानावर सोलार फवारणी पंप
राज्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर या अगोदर नॅनो युरिया, डीएपी आणि बॅटरी फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज स्वीकारले होते. त्यानंतर आता सोलर चलित फवारणी पंप (Solar Sprayer Pump) साठी अर्ज सुरु झाले आहेत तरी शेतकऱ्यांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्यावा, सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसाठी अर्ज कसा करावा पाहूयात त्याविषयी सविस्तर माहिती.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
Solar Sprayer Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी अर्ज कसा कराल?
संकेतस्थळाला भेट द्या:
. https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
“अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
“कृषी यांत्रिकीकरण” -> “मुख्य घटक” -> “कृषी यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य” निवडा.
“मनुष्यचलीत औजारे” घटक निवडा.
“यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे” मध्ये “पिक संरक्षण औजारे” पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर मशीनचा प्रकार या मध्ये “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप” हा घडक निवडून आपला अर्ज सादर करावा.