car viral video मुंबईतील कुर्ला बेस्ट बस अपघाताची भीषण घटना ताजी असतानाच देशभरातून अशा अनेक घटना समोर येत आहेत. कुर्ल्यातील बस अपघातात आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आणि ४९ जण जखमी झाले. त्यांच्यावर सायन, भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मंगळवारी गुजरातमधून एका भीषण अपघाताची घटना समोर आली; ज्यात एक भरधाव एसयूव्ही कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाब्यात घुसली. त्यावेळी तेथे बसलेले तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ढाब्यावर लोक जेवत असतानाच हा भीषण अपघात झाला. दरम्यान, सोशल मीडियावर या थरारक अपघाताच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये रेकॉर्ड झालेला व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहताना तुमच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कार चालक हॉर्न वाजत, हेडलाईट मारत राहिला पण…व्हिडीओमध्ये एक कार अचानक ढाब्याच्या दिशेने सुसाट वेगाने येताना दिसतेय. त्यावेळी सतत हॉर्न वाजवत आणि ढाब्याच्या बाजूने लावलेल्या हिरव्या कपड्यावर हेडलाईट मारत ती अनियंत्रित कार लोकांना बाजूला होण्याचा इशारा करीत होती; पण लोकांना काही कळण्याच्या आत ती कार ढाब्यात घुसली अन् जेवत बसलेल्या लोकांना सरळ उडवीत पुढे गेली. या घटनेचा व्हिडीओ पाहताना तुम्हालाही धडकी भरेल. कारण- हा अपघातच तितका भीषण होता.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी
इथे क्लिक करा
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या घटनेचा व्हिडीओ रात्री १०.३० ते १ च्या दरम्यानचा असल्याचे सांगितले जाते. बोडेली येथील एका रस्त्याच्या कडेला असलेल्या अनधिकृत ढाब्यामध्ये काही ग्राहक बसले होते. ढाब्याच्या आत प्लास्टिक टेबल, खुर्च्या आणि बाजूने पडद्याची भिंत म्हणून हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले होते.
वायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठीइथे क्लिक करा
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ढाब्यामध्ये तीन ग्राहक बसून आरामात जेवण करीत होते आणि तिथला एक कर्मचारी ग्राहकांना काय हवे नको ते पाहत होता. सर्व व्यवस्थित सुरू असतानाच एक भरधाव अनियंत्रित एसयूव्ही कार हेडलाईट दाखवत थेट ढाब्यात घुसली अन् जेवणाऱ्या ग्राहकांना उडवीत पुढे गेली. त्यावेळी एक ग्राहक वेळीच सतर्क झाला आणि त्याने तिथून धाव घेत आपला जीव वाचवला; पण जेवणात मग्न असलेल्या इतर दोन ग्राहकांना कार सरळ उडवीत पुढे गेली. या अपघातात तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.