कर्ज घेण्यापासून ते क्रेडिट कार्डपर्यंत अनेक वित्तीय संस्थांकडून तुम्ह CIBIL स्कोअरबद्दल ऐकलं असेल. कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचा सिबिल कसा आहे, हे ते तपासून पाहतात. अनेकांना सिबिलबद्दल माहिती नसते. जेव्हा तुम्ही कर्ज घेण्यासाठी बँकेकडे किंवा वित्तीय संस्थेकडे जाता, तेव्हा तुम्हाला सिबिलचं महत्त्व समजतं. तर आज जाणून घेऊ सिबिल म्हणजे काय आणि काय आहे त्याचं महत्त्व.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
सिबिल म्हणजेच क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो इंडिया लिमिटेड (Credit Information Bureau India Limited). ही एक कंपनी आहे जी क्रेडिटची माहिती देते. ही कंपनी व्यक्ती किंवा संघटनांच्या क्रेडिट संबंधित माहिती आणि अन्य बाबींचे रेकॉर्ड तयार करून आपल्याकडे ठेवते.
जेव्हा कोणतीही व्यक्ती कर्जासाठी अर्ज करते, तेव्हा त्याचा सिबिल तपासला जातो. बँका, वित्तीय संस्था अन्य वित्तीय संस्था, ग्राहकांची क्रेडिट माहिती, ब्युरोकडे पाठवतात आणि त्या ठिकाणी त्यांचा रेकॉर्ड ठेवला जातो. या दिलेल्या माहितीच्या आधारे सिबिल, क्रेडिटशी निगडीत सीआयआर जारी करतो आणि ग्राहकांना एक क्रेडिट स्कोअर देतो. यालाच सिबिल स्कोअर असं म्हणतात.