Ladki Bahin Yojana महिलांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लाडकी बहिण योजनवरुन (Ladki Bahin Yojana) आमच्यावर टीका केली जात आहे. ही योजना बंद होणार असे सांगतिले जात आहे. पण येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहिण योजनेबाबत अजित पवार यांना मोठं वक्तव्य केलं आहे. कालच मी 3 हजार 500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली आहे. येत्या आठवड्यात लाडक्या बहिणींना पैसे मिळणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एक रुपयात पिक विमा दिला मात्र त्याचे गैरप्रकार किती केले. गायरान जमीन शासकीय जमीन यावर पिक विमा काढण्यात आला आहे. कुठे फेडला हे पाप? योजनेचा योग्य फायदा घेतला पाहिजे असंही अजित पवार म्हणाले.
यादीत नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आज काय आपण बघतोय, टीव्ही लावला की हा आमका असा म्हणाला तो तसा म्हणवा. आरोप प्रत्यारोप करुन सामन्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असेही अजित पवार म्हणाले. ब्रेकिंग न्यूज दाखवली जातायेत. सूत्र सूत्र अरे कुठे आहेत सूत्र. सर्वांना सांगतो या बातम्यावर विश्वास ठेवू नका असेही अजित पवार म्हणाले. माझा राजकारणात 1991 साली प्रवास सुरू झाला. मराठवाडा विदर्भ खानदेश राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या अभ्यास आम्हाला करायला भेटल्याचे अजित पवार म्हणाले. सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणतो असंहीअजित पवार म्हणाले.