Leopard Milkman Bike Video : माणसाची वेळ चांगली असेल, तर कोणतंही संकट त्याचं काही बिघडवू शकत नाही, असं तुम्ही ऐकलं असेलच. सोशल मीडियावर यासंबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हाला याची खरी प्रचिती येईल. या व्हिडीओमध्ये पहाटेच्या सुमारास रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला जोरदार धडक दिल्यानंतरही दूधवाला दुचाकीस्वाराचे प्राण कसे वाचले हे तुम्ही पाहू शकता. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल त्या दूधवाल्याचे नशीब बलवत्तर होते म्हणून त्याचा जीव वाचला, अन्यथा मोठा अपघात झाला असता किंवा बिबट्याच्या हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला असता.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दूधविक्रेता कशा प्रकारे एका भीषण अपघातातून थोडक्यात बचावला आहे. ही भीषण घटना राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडली आहे. जिथे पहाटेच्या सुमारास एक बिबट्या रहिवासी भागात घुसला आणि रस्ता ओलांडताना एका दूधवाल्याच्या दुचाकीला धडकला. त्यानंतर असे काही घडले की, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ रस्त्यावरील एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे, जो आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ही घटना राजस्थानच्या उदयपूरमधील शिल्पग्राम मेन रोडवर रात्री ८ च्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. जिथे एका रस्ता ओलांडणाऱ्या एका बिबट्याला एका दूधविक्रेत्याच्या दुचाकीची जोरदार धडक बसते. व्हिडीओमध्ये बिबट्या एका रहिवासी भागातील भिंतीवरून उडी मारून रस्ता ओलांडताना दिसत आहे. तो रस्ता ओलांडत असताना एक दूधविक्रेत्याची दुचाकी येऊन त्याच्यावर येऊन धडकते. त्यानंतर दूधवाला दुचाकीसह काही अंतरापर्यंत फरपटत जातो आणि खाली कोसळतो. या दुर्घटनेत बिबट्याही जखमी झाल्याने रस्त्यावर काही सेकंद पडून राहतो. बिबट्या अन् दुचाकीच्या धडकेत मोठ्या प्रमाणात दूध रस्त्यावर सांडते.