सामूहिक कॉपी आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द, कॉपीसाठी मदत करणाऱ्या शिक्षक, कर्मचाऱ्यांची थेट सेवेतून बडतर्फी; राज्य सरकारचा मोठा निर्णय..!HSC Exam News…|

 

 

 

इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सामूहिक कॉपीचे प्रकार ज्या परीक्षा केंद्रावर उघडकीस येतील त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी तसेच जे शिक्षक आणि कर्मचारी कॉपीठी मदत करतील त्यांना सेवेतून बडतर्फ करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत आणि कार्यवाही करण्याबाबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री उपस्थित होते.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

 

परीक्षा केंद्रावर होणार आहे. दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च कालावधीत ५,१३० परीक्षा केंद्रावर होणार आहे. यासाठी सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

 

कॉपीमुक्त परीक्षेची अंमलबजावणी

 

परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६३ ची कडक अंमलबजावणी करावी, परीक्षा केंद्रावर व १०० मीटर परिसरात अनाधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध करण्यात यावा, परीक्षा केंद्रात प्रवेश देतांना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य (पुस्तके, नोटस्, मोबाइल इत्यादी) जवळ बाळगणार नाहीत याची खबरदारी घ्यावी, भरारी पथकाव्दारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!