महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख आणि वेळ ठरली; ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार..!Maharashtra Politics..|

 

महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराची तारीख अखेर निश्चित झाली आहे. १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजता राजभवनात शपथविधीचा सोहळा होणार आहे. यामध्ये ३५ आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अधिक महत्त्व देण्यात येणार असल्याचे समजते.सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये खातेवाटपाचा २०-१०-१० असा फॉर्म्युला ठरला आहे. भाजपला सर्वाधिक २० खाती, शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना प्रत्येकी १० खाती मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

भाजपचाच वरचष्मा –

 

 

हिवाळी अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार पार पडणार आहे. भाजपचे सर्वात जास्त आमदार असल्यामुळे वर्चचष्मा त्यांचाच असेल. १४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता तिन्ही पक्षाचे मिळून ३५ मंत्री शपथ घेणार असल्याचे समोर आलेय.

 

मंत्रीमंडळ विस्ताराबाबत भाजपचा वरचष्मा कायम राहणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपकडे सर्वाधिक २० खाती राहण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना १०-१० खाती मिळणार आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

कुणाकडे कोणतं खातं?

 

देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या दिल्लीतील बैठकीत झालेल्या चर्चेतून काही महत्त्वाचे मुद्दे समोर येत आहेत. गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खाती भाजपकडेच राहतील. नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वाट्याला महसूल मिळू शकते. भाजपकडून सार्वजनिक बांधकाम खाते इतर गटाला सोपवण्याची तयारी असल्याचे सांगितले जात आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा वर्चस्व टिकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपकडे गृह आणि अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती राहतील. शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे, तर अजित पवार गटाला महसूल खाते देण्यात येऊ शकते.मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महायुतीची बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीनंतर खातेवाटप निश्चित होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

महायुतीची बैठक, मंत्रिमंडळावर शिक्कामोर्तब होणार –

मंत्रिमंडळ विस्ताराला अंतिम स्वरूप मुंबईतील महायुतीच्या बैठकीनंतर मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ही बैठक होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या अंतिम बैठकीनंतर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेण्यासाठी दिल्लीला पोहचले आहेत. त्यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याआधी बुधवारी त्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महाराष्ट्रातील खातेवाटपावर चर्चा झाली आहे.

 

 

 

दिल्लीतील भेटी आणि चर्चासत्रे

 

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याशी भेट घेतली आहे. या बैठकींमध्ये खातेवाटपावर चर्चा झाली असल्याचे सांगितले जात आहे.

 

शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचा समन्वय

 

राज्यातील महायुतीतील तीन पक्षांमध्ये समन्वय साधून खातेवाटपाचे अंतिम स्वरूप ठरवण्यात येणार आहे. भाजपकडे महत्त्वाची खाती राहतील, तर इतर गटांना समतोल राखत वाटप केले जाणार आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी सत्ता स्थैर्याला मजबुती मिळण्याचीअपेक्षा आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 

 

 

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!