Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविली आहे. पुणे, मराठवाडा, विदर्भात हलक्या पावसाचा
अंदाज पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसणार आहे. हवामान खात्याने कोकण, उत्तर कोकण आणि घाटमाथ्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविली आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही अंशी पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र असले तरी कोकण, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्याच्या भागांत पावसाची सध्या जोरदार शक्यता कायम आहे. तसेच, मराठवाडा आणि विदर्भातही हलक्या पावसाचा
कोकण
कोकणात आज अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येईल. काही भागांत मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल तर काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्र
उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांतही काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह वादळ व ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पावसाचा स्वरूप हलका ते मध्यम राहील.
मध्य महाराष्ट्र
मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, तर काही भागांत जोरदार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. उद्याही अशाच प्रकारचे हवामान राहील.l