Maharashtra Weather Update: राज्यात यंदा सततच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांना आता गारठा जाणवू लागलाय. उत्तर महाराष्ट्राला चांगलीच हुडहुडी भरली आहे. येत्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही गारठा वाढू लागल्यानं वळचणीला ठेवलेल्या स्वेटर, कानटोप्या आता बाहेर काढल्या जाऊ लागल्या आहेत. भारती
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
नोव्हेंबरच्या शेवटी तापमान घसरणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात यंदा कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे.उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय.
आयएमडीचा विभागनिहाय अंदाज काय?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस तापमानात फारसा फरक दिसणार नसला तरी येत्या 24 तासानंतर 2 ते 3 अंशाने तापमान घसरण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवसात हळूहळू तापमान घटणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने सांगितलं आहे. पुढील पाच दिवसात विदर्भात तापमानात फारसा फरक नाही. दरम्यान संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा