Pradhan Mantri Awas Yojana नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारतर्फे चालू केली गेली. याच योजनेला महाराष्ट्र मध्ये घरकुल योजना असे म्हणतात. या योजनेची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत दोन मुख्य प्रकार पाडले गेले ग्रामीण आणि शहरी.घरकुल योजनेच्या दुसऱ्या टप्प्या अंतर्गत आता हजारो घरे मंजूर करण्यात आलेले आहेत लाभार्थ्यांना याचा लाभ लवकरच मिळेल.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या योजनेअंतर्गत गावातील लोकांना घर बनवण्यासाठी पैसे दिले जातात. या योजनेचा उद्देश म्हणजे गावातील प्रत्येक घरे पक्के बनले पाहिजे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार रुपये इतकी आर्थिक मदत केली जाते. ही मदत देत असताना राज्य सरकारला 60% रक्कम आणि केंद्र सरकारला 40% रक्कम द्यावी लागते.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
.
प्रधानमंत्री आवास योजना शहरी या योजनेअंतर्गत शहरातील लोकांना सबसिडी दिली जाते. ग्रामीण पेक्षा शहरी भागातील लोकांना मिळणारी सबसिडी ही जास्त असते.
पात्रता Eligibility Criteria
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) – ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹३ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक
कमी उत्पन्न गट (LIG) – ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹३ ते ६ च्या मध्ये
मध्यम उत्पन्न गट-I (MIG-I) – ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹६ ते १२ च्या मध्ये
मध्यम उत्पन्न गट-II (MIG-II) – ज्यांचे वार्षिक उत्पन्न ₹१२ ते १८ च्या मध्ये
शहरी भागातील लोकांना सबसिडी देण्यासाठी चार प्रकार करण्यात आलेले आहेत. पहिला प्रकार म्हणजे ज्यांचे उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी आहे. दुसऱ्या वर्ग म्हणजे ज्यांचे उत्पन्न तीन ते सहा लाखांच्या मदत आहेत. तिसरा प्रकार म्हणजे ज्यांचे उत्पन्न सहा ते बारा लाखांच्या मदत आहे. आणि चौथा प्रकार म्हणजे ज्यांचे उत्पन्न 12 लाख ते 18 लाखांच्या मधात आहे.
Benefits & Subsidy फायदे आणि अनुदान
अनुदानाची कमाल मर्यादा:
EWS आणि LIG साठी – ₹२.६७ लाख
एमआयजी-१ साठी – ₹२.३५ लाख
MIG-II साठी – ₹२.३० लाख
शहरी भागातील लोकांना घर बांधण्यासाठी साडेसहा रुपये टक्क्यांनी व्याज सबसिडी दिली जाते. ही सबसिडी जास्तीत जास्त वीस वर्षांपर्यंत तुम्ही वापरू शकता.
आवश्यक कागदपत्रे Required Documents
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रे लागतात पहिलं म्हणजे आयडेंटी कार्ड यामध्ये तुम्ही आधार कार्ड वोटर आयडी पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स चा उपयोग करू शकता. त्यानंतर घराचा पत्ता व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला वीज बिल राशन कार्ड पासपोर्ट आधार कार्डचा वापर करू शकता. आणि उत्पन्न प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही पगार पत्रक बँक स्टेटमेंट किंवा आयटीआर चा वापर करू शकता. त्यानंतर जमिनीचे कागदपत्र तुम्हाला द्यावे लागतील बँकच्या पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो.
अर्ज Application
यामध्ये दोन प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाइन पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री आवास योजना याच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता यामध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपला ऑनलाईन या बटनावर क्लिक करावे लागेल त्यानंतर आधार नंबर व्हेरिफाय करावा लागेल आणि आवश्यक असलेले कागदपत्र अपलोड करावे लागतील तसेच जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर तुम्ही तुमच्या जवळ येईल सीएससी केंद्र म्हणजे जन सुविधा केंद्र या ठिकाणी जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता
PMAY अंतर्गत गृह कर्ज Home Loan under PMAY
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक नवीन योजना सुरू करण्यात आलेली आहे. ती म्हणजे तुम्ही आता या योजनेअंतर्गत घरांसाठी कर्ज घेऊ शकता हे कर्ज तुम्हाला कमीत कमी व्याजदराचा उपलब्ध करून दिले जाईल. यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त व्याजदर 6.5% रुपये एवढा असतो आणि तुम्हाला या योजनेतर्फे जास्तीत जास्त रक्कम सहा लाख रुपये पर्यंत दिली जाते आणि ही रक्कम तुम्ही वीस वर्षांपर्यंत वापरूशकता.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा