Rain Season Waterfall Viral Video:पावसाळ्यामध्ये अनेकांना वर्षा विहार करण्याचा मोह होतो त्यामुळे धबधबा, झरा असलेल्या ठिकाणी अनेकदा लोक भेट देतात. गड-किल्यांना भेट देतात जिथे निसर्गाच्या सौंदर्य पाहून मन शातं होते.
पण अनेकदा अशा ठिकाणी काही उत्साही लोक स्वत:च जीव धोक्यात टाकतात. पावसाळ्यात होणाऱ्या दुर्घटनांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात त्यामुळे अशा ठिकाणी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले जाते. पण लोक त्याकडे दुर्लक्ष करतात अन् नको ते धाडस करायला जातात अ्न जीव गमावतात.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नुकताच गंगा नदीमध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तसेच कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याने ४ लोकांचा मृत्यू झाला तर अनेक लोक वाहून गेले. ही घटना ताजी असतानाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही तरुण धबधब्यावरून खाली पडताना दिसत आहे जे पाहून काळजाचा थरकाप उडत आहे.
धबधब्यावरून खाली पडले दोन तरुण
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते काही काही तरुण एका धबधब्याच्या खाली उभा राहून फोटो काढत आहे तेवढ्यात वरून दोन तरुण त्यांच्या अंगावर पडतात. सर्व काही इतके अचानक घडते की कोणालाही सावरण्याचा वेळ मिळत नाही.
धबधब्यावरून खाली पडणारे तरुण खाली उभ्या असल्यामुळे वाचले पण खाली उभ्या असलेल्या तरुणांना मोठी दुखापत झाल्याचे दिसत आहे. खाली उभ्या असलेल्या दोन तरुण बेशुद्ध अवस्थेत पाण्यात पडले असल्याचे दिसते. काही लोक मदतीला धावून येतात आणि त्यांना ओढून पाण्यातून बाहेर काढतात. व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडत आहे.
व्हायरल व्हिडिओ नक्की कुठला आहे आणि ही घडला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. अपघातामध्ये जखमी झालेल्या तरुण वाचले की नाही याबाबतही स्पष्ट माहित नाही. पण व्हायरल व्हिडिओ पावसाळ्यामध्ये फिरायला गेल्यानंतर काय करू नये हे दर्शवत आहे. आपली एक चूक आपल्या किंवा एखाद्याच्या जीवावर बेतू शकते.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यानी व्यक्त केला रोष
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी धबधब्याच्या वरच्या भागात गेलेल्या तरुणांच्या कृतीवर रोष व्यक्त केला.व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, खाली उभ्या असलेल्या मुलांची काय चूकी होती. ते मस्ता फोटो काढत होते ना. केलं कोणी अन् भोगायला कोणाला लागलं.”
दुसऱ्याने कमेंट केली की, भावांनो, फिरायला जा पण अशी जीवघेणी मस्ती करू नका. आई वडील विश्वासाने पाठवतात. परत येण्याची वाट बघतात. दोन रुपयांची दारू पिऊ नशा करून असली फालतूगिरी करू नका. “