Raj Thackeray-Uddhav Thackeray Rally Live Updates: हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर जल्लोष करण्यासाठी शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या वतीने आज विजयी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे दोन दशकानंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसले. यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. आमची मुले इंग्रजी शाळेत शिकले, तसे बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरेही इंग्रजी शाळेत शिकले होते, पण त्यांचा मराठी अभिमान तसूभर कमी झाला नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. मराठीसाठी यापुढेही एकजूट कायम राहो, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
उद्धव ठाकरे यांनीही आपल्या भाषणातून भाजपावर जोरदार टीका केली. आम्ही निवडणुकीसाठी नाही तर मराठीसाठी एकत्र आलो आहोत, असे ते म्हणाले.
शिंदेकडून एका भावावर स्तुती सुमने; दुसऱ्यावर जहरी टीका
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
मुंबईतील वरळी येथे हिंदी भाषा सक्ती आदेश रद्द निर्णयाचा विजयी मेळावा पार पडताच एकनाथ शिंदेच्या ट्विटर अकाऊंट वर एका भावावर स्तुती सुमने, तर दुसऱ्यावर जहरी टीका केल्याचे दिसून आले. …सविस्तर बातमी
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा