Snake Scorpion Fight Viral Video:शिकारी आणि शिकारशी संबंधित एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये असे काहीतरी दृश्य आहे जे तुम्ही याआधी कधीही पाहिले नसेल. हा व्हिडीओ वास्तवात शिकार शोधत असलेल्या सुमारे सात फूट लांबीच्या सापाशी संबंधित आहे. काही वेळातच सापाला हा विंचू नजरेस पडला आणि त्याने त्याचे जेवण समजून त्याची शिकार करण्याचा बेत आखला. साप शिकार सावज टप्यात येण्यासाठी पुढे सरकतो आणि संधी मिळताच त्याच्यावर वार करतो. काही सेकंदातच सापाने विंचवाचे तोंड दाबून त्याला शांत केले. आता जिवंत असताना तो त्याला आपल्या तोंडात अन्नाचा घास गिळण्याचा प्रयत्न करतो. पण पाच सेकंदातच असे काही घडले की, सात फूट लांबीच्या सापालाच ब्रम्हांड आठवले असणार. एवढी छोटी शिकार खाण्याच्या प्रयत्नात तो अडचणीत येईल याची सापाला कल्पनाही नसेल.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या सुरुवातीलाच सापाने विंचवावर हल्ला करून त्याचे तोंड पकडल्याचे दिसत आहे. आता तो त्याला जिवंत गिळण्याचा प्रयत्न करतो. सापाने विंचू गिळण्याआधीच त्याने जोरदार हालचाल केल्याचे आपल्याला फ्रेममध्ये दिसेल. विंचवाने सापाचा जबडा आपल्या नांगीने पकडला. आता साप त्याला गिळण्याचा खूप प्रयत्न करतो आणि मग विंचू त्याला तितक्याच ताकदीने इजा करतो. विंचू सतत आपल्या नांगीने हल्ला करतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल की विंचू सुद्धा सापाला डंख मारण्याचा प्रयत्न करतो. एवढ्या लहानशा प्राण्याने स्वतःवर हल्ला केल्याचे पाहून सापाचाही धीर सुटला. शेवटी सापाने शिकार सोडण्याचा निर्णय घेतला असे दिसून येते.
व्हिडिओ पाहण्यासाठीइथे क्लिक करा