snake viral video भारतात कधी काय घडेल हे कोणी सांगू शकत नाही. ‘भारत खरोखरच नवशिक्यांसाठी नाही’ हे पुन्हा एकदसिद्ध करणारा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर नुकताच शेअर करण्यात आला आहे. या क्लिपमध्ये एक माणूस एका साध्या साधनाचा आणि त्याच्या पायाचा वापर करून कालव्यातून एक मोठा अजगर बाहेर काढताना दिसत होता! हा माणूस विषारी सापाबरोबर हा जीवघेणा स्टंट करत असताना दिसत आहे आणि तिथेच पुलावर उभे राहून लोक हा प्रकार पाहत बसले आहेत. या घटनेची नेमकी तारीख आणि ठिकाण निश्चित अद्याप समजलेली नाही. अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना प्रश्न पडला आहे की नक्की हा माणूस काय करत आहे आणि का?
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते एका छोट्या कालव्यावरील पुलावर खांबावर एक माणूस उतरतो जिथे उभे राहायला देखील जागा नाही. तो पुलाच्या भिंतीचा आधार घेऊन कसबसा उभा राहतो आणि पाण्यातून विषारी अजगर बाहेर काढतो. प्रथम तो साप पकडण्याचा आकडा वापरतो आणि सापाला पाण्याबाहेर ओढतो त्यानंतर पायावर सापाला पकडून ठेवतो आणि हातातील आकडा फेकून देत हातात अजगराची शेपटी पकडतो. त्यानंतर एका हातात १५ फुटाचा अजगर पकडून पुलाच्या भिंतीवर चढतो. भिंतीवर उभे राहताना त्याचा तोल जाणार असतो तो कसबसा तोल सावरतो. सापाला बाहेर काढता जमलेले लोक धावत सुटतात. तरुण तोल सावरून दोन्ही हातांनी ओढत सापाला बाहेर काढतो. थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर लगेचच व्हायरल झाला, ज्यामुळे लोकांनी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या. बहुतेकांना हे कृत्य अनावश्यक वाटले आणि सापाच्या अधिवासात अडथळा आणल्याबद्दल त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे असे मत मांडले, तर काही लोक फक्त स्टंटमागील कारण विचारत राहिले. काहींनी असाही अंदाज लावला की, कदाचित लोक कालव्याचा वापर करत असावे, ज्यामुळे लोकांनी कालव्यातून सापाला बाहेर काढले असावे.