Viral Video: लग्नाआधी हळदीचा कार्यक्रम असो, लग्नाची वरात असो किंवा एखाद्याची बर्थडे पार्टी… अशा कार्यक्रमांमध्ये काहीजण बेभान होऊन नाचतात. अनेकांना नाचण्याची (Dance) खूप आवड असते आणि यासाठी ते फक्त एखाद्या कार्यक्रमाची वाट पाहत असतात. प्रत्येकाची स्वतःची अशी वेगळी नृत्यशैली असते. प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे नाचतो. काही जण प्रो डान्सर असतात, तर काही केवळ वरातीत करतात तसा नागिन डान्स (Nagin Dance) करणारे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आता सध्या सोशल मीडियावर एक असाच व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एका पठ्ठ्याने नागिन डान्सलाही मागे टाकत भन्नाट असा डान्स केला आहे, जो पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील व्यक्ती फार जोशात नाचताना दिसत आहे. गाणं गाणाऱ्या व्यक्तीसमोर उभं राहून ही व्यक्ती बेभान झाली आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा