Viral Video: सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित व्हायरल झालेले व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या व्हिडीओंमध्ये कधी प्राण्यांचं हिंसक रूप आपल्याला पाहायला मिळते; तर कधी आपल्याला प्राण्यांच्या गमती-जमती दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय लोक गाईला आई मानून, तिची पूजा करतात. त्यामुळे गाईला गोमातादेखील म्हटलं जातं. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. काही वर्षांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता; ज्यात एक चिमुकला गाईच्या अवतीभोवती खेळताना दिसला होता. पण, हेच पाळीव प्राणी कधी त्यांचं रौद्र रूप दाखवतील हे कोणीही सांगू शकत नाहीत. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात एक गाय एका महिलेला धडक मारताना दिसत आहे
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा