राज्याच्या ग्रामविकास खात्यामार्फत गेल्या वर्षभरात १९ हजार कर्मचाऱ्यांची पद भरती राज्य शासनाने हाती घेतली असून, या भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परीक्षा घेणे ही सोपी बाब नाही. मात्र, असे असतानाही अत्यंत पारदर्शकपणे परीक्षा घेऊन उमेदवारांना गुरुवारी (ता. २५) नियुक्तीपत्र दिले जात आहेत, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
आपल्याला मिळालेली शासकीय नोकरी ही सेवा म्हणून केल्यास नक्कीच गोरगरीब वंचित घटकाला आपण न्याय देऊ शकतो. शासकीय नोकरीत गोरगरिबांची सेवा करून विश्वात संपादन करा, जनतेची मने जिंका, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. संभाजीराजे नाट्यगृहात गुरुवारी महाभरती २०२३-२४ अंतर्गत अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र वाटप व जळगाव पर्यटन चित्रफितीच्या लोकार्पण झाले. त्यावेळी मंत्रीद्वयी बोलत होते.
मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे, लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. डी. लोखंडे, प्रशिक्षणातील सहाय्यक जिल्हाधिकारी