DA Hike New Update:राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मकर संक्रांतीची आनंदाची बातमी!राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 6 महिन्यांचा महागाई भत्ता थकबाकी आणि 53% डीए वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सध्या राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 50% आहे, जो आणखी 3% वाढून 53% होऊ शकतो.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए वाढ
जुलै 2024 पासून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए 50% वरून 53% केला आहे. राज्य कर्मचाऱ्यांनाही या धरतीवर डीए वाढ लागू होण्याची अपेक्षा आहे.
राज्य कर्मचाऱ्यांसाठी डीए वाढ कधी मिळणार?
मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक लवकरच होणार असून या बैठकीत डीए वाढीचा निर्णय होण्याची शक्यता आहे. जर निर्णय घेतला गेला, तर जानेवारीच्या वेतनासोबतच जुलै ते डिसेंबर या सहा महिन्यांचा थकबाकी महागाई भत्ता आणि 53% डीए वाढ लागू होऊ शकतो.
फायदा कधी मिळणार?राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2024 पासून लागू झालेल्या वाढीचा थेट लाभ फेब्रुवारी 2025 च्या वेतन व पेन्शनसोबत मिळू शकतो. यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होईल.
सरकारचा निर्णय महत्त्वाचा
फडणवीस सरकारने लवकरच निर्णय घेतल्यास, मकर संक्रांतीच्या निमित्ताने हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट ठरू शकतो.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा