ट्रेंडिंग

भररस्त्यात कपलने काय केलं पाहा! गाड्या थांबल्या तरी भान नाही, पाहा VIDEO

Couple Viral Video: प्रेम करायला जागा अन् वेळ-काळ बघावा लागत नाही, असं म्हणतात. एखाद्या व्यक्तीवर आपलं प्रेम असलं की, ते मनमोकळेपणानं बोलून दाखवावं, त्याच्यासमोर मनातलं सगळं व्यक्त करावं, असं अनेकांना वाटत असतं.

आजकाल उद्यान, ट्रेन अशा सार्वजनिक ठिकाणीही कपल्स अगदी जगाची चिंता न करता आपलं प्रेम व्यक्त करू लागले आहेत.

प्रेम व्यक्त करण्यात काही चुकीचं नाही; पण आजूबाजूचं भान ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होत नाही ना याची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. पण, आजकाल तरुण-तरुणी कुठेही आपल्या मर्यादा ओलांडू लागले आहेत.

याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना आपण पाहिलेच असतील. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक कपल रस्त्याच्या मधोमध एकमेकांना मिठी मारताना दिसतंय.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक कपल भररस्त्यात एकमेकांना मिठी मारताना दिसतंय. या कपलच्या मागे गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत; पण हे कपल रस्त्याच्या अगदी मधोमध रोमान्स करत आहे.

थोडा वेळ वाट पाहून मग चालकही वैतागून गाडीतून उतरतात आणि त्या कपलच्या आजूबाजूला जमा होतात. तेवढ्यात ट्रॅफिक पोलिसदेखील येतात आणि सगळे या कपलला रस्त्यातून जाण्यास सांगतात. एवढा आरडाओरडा, भांडण सुरू असूनही हे प्रेमी युगुल काय रस्त्यातून हटतच नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!