ट्रेंडिंग

लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शन हस्तांतर केल्यास 3 मोफत सिलेंडर मिळणार ! राज्य शासनाचा नवीन निर्णय

Free gas cylinder:कुटुंबातील कुणाच्याही नावावर असलेले गॅस कनेक्शन लाडक्या बहिणीच्या नावावर हस्तांतर केल्यास तिला केंद्र सरकारच्या उज्ज्वला गॅस योजनेतील वर्षातून तीन मोफत सिलिंडरचा लाभ होईल, असा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला.

राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मिळत असलेला तीन सिलिंडर मोफत देण्याचा लाभ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय शासनाने ३० जुलै २०२४ ला घेतला. ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना म्हणून राबविण्यात येत आहे.

आकाशवाणीसह विविध वृत्तवाहिन्यांवरून त्याच्या जाहिरातीचाही भडिमार सुरू आहे, परंतु गॅस कनेक्शन पुरुषांच्या नावावरच जास्त आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ होत नव्हता. त्याबद्दल राज्यभरातून तक्रारी झाल्या. मग ही योजना जाहीर होऊन उपयोग काय, अशीही विचारणा झाली. त्यामुळे योजनेच्या निकषामध्ये बदल केले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत महिला व बालविकास विभागाकडून पात्र ठरविण्यात आलेल्या लाभाथ्यर्थ्यांपैकी १ जुलै २०२४ पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅसजोडणी असलेल्या महिला लाभाथ्यर्थ्यांनी गॅस जोडणी हस्तांतर केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरतील, असे या आदेशात म्हटले आहे. राज्यात जुलैमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू झाली. तेव्हापासून गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यातून १० लाख २२ हजार ४१ अर्ज आले आहेत.

इतर बातम्या पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यापैकी १० लाख ६ हजार अर्जाना मंजुरी मिळाली आहे. सुमारे नव्वद टक्के महिलांच्या खात्यावर तीन महिन्यांचे ४५०० रुपये जमा झाले आहेत. परंतु त्यापैकी उज्ज्वला गॅस कनेक्शन नावावर असलेल्या महिलांची संख्या केवळ अडीच लाख इतकीच आहे. त्यामुळे उर्वरित साडेसात लाख महिलांना मोफत ३ गॅस सिलिंडरचा लाभ मिळणार नव्हता. तो आता नव्या आदेशामुळे मिळणार आहे.

आपल्याकडे गॅस, वीज आणि पाण्याची कनेक्शन्स पुरुषांच्याच नावे आहेत. आता किमान मोफत गॅस मिळते आहे म्हणून का असेना ती महिलांच्या नावावर करावी लागतील. त्यासाठी तुमच्या मूळ कनेक्शन्सवेळी दिलेली सर्व कागदपत्रे लागतील.

५०० रुपयांच्या स्टॅम्पवर कनेक्शन्स हस्तांतर करत असल्याचे लिहून द्यावे लागेल. कनेक्शन्स हस्तांतर करण्यासाठी गॅस एजन्सींना मोहीम घ्यावी लागेल, कारण कंपनीकडील सगळे रेकॉर्डच बदलावे लागणार आहे. त्यात आणखी शेगडी घ्या, पाइप घ्या अशी अटी सुरू झाल्या, तर नको ते कनेक्शन म्हणण्याची पाळी येऊ शकते.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!