ट्रेंडिंग

मोठी बातमी आचारसंहिता १३ ऑक्टोबरपासून लागू होणार ?

Maharashtra Assembly Election 2024:केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठीचा आढावा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात त्यांनी दिवाळीपूर्वी निवडणुका होणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, हरियाणा आणि जम्मू काश्मीवर निवडणुकीचा ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे.

यानंतर १० ऑक्टोबरला या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम संपेल, नियमानुसार एका निवडणुकीचा कार्यक्रम संपेपर्यंत दुसरी निवडणूक घोषित करता येत नाही.त्यामुळे राज्यात १३ ऑक्टोबरनंतर विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल आणि त्याच दिवशीपासून आचारसंहिता लागू होणार असल्याची दाट शक्यता आहे.

महाराष्ट्रात नवी विधानसभा २६ नोव्हेंबर २०२४ रोजी अस्तित्वात यायला हवी. तत्पूर्वी निवडणुकीसाठी मतदान होऊन निकाल लागणे आवश्यक आहे.निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर ४५ दिवसांनी नवीन विधानसभा गठीत करावी लागते.

नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडयात मतदान घ्यायचे ठरवले तर त्यासाठी ऑक्टोबरला १३ ते १६ या तारखांमध्ये आदर्श आचारसंहिता लागू करावी लागेल.त्यामुळे ४५ दिवसांनी राज्यात नवे सरकार येऊ शकते. अलीकडेच विधानसभा निवडणूक वेळेवर होण्याचे संकेत केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिले.

दावे-प्रतिदावे सुरू

राज्यात विधानसभा निवडणुकीची गेल्या काही महिन्यांपासूनच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. त्यात सध्या सर्वच राजकीय पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरू आहे. यंदा सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये घडलेल्या नाट्यमय राजकीय घटना आणि पक्षफुटीनंतर संपूर्ण राजकीय गणिते बदलली आहे. यामुळे निवडणुकीतील विजयाबाबत दावे प्रतिदावे होत आहेत.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!