ट्रेंडिंग

School Holidays list : शाळा सुट्ट्यांची यादी जाहीर, तब्बल ७८ दिवस सुट्ट्या!

School Holidays list : शाळा सुट्ट्यांची यादी जाहीर, तब्बल ७८ दिवस सुट्ट्या!

School Holidays : यंदाच्या शैक्षणिक वर्षात १ ऑगस्ट ते ३० एप्रिल या नऊ महिन्यात शाळांना ७८ दिवस सुटी असणार आहे. त्यात सार्वजनिक उत्सवाच्या ४२ तर दर महिन्यातील चार रविवार, अशी सुट्यांची यादी शासकीय विभागांकडून जाहीर करण्यात आली आहे.१५ जूनपासून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. सुट्यांच्या शासकीय यादीनुसार, आषाढी एकादशी निमित्ताने, २९ जूनला सुटी होती. आता २९ जुलैला मोहरमनिमित्त सुटी असणार आहे. त्यानंतर १ मे रोजी महाराष्ट्र व कामगार दिनाचीही सुटी असेल.

सर्व बातम्या मोफत पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

तत्पूर्वी, स्वातंत्र्य दिनापासून महावीर जयंतीपर्यंत शाळांना रविवार वगळून ४२ सुट्या असणार आहेत. बहुतेक शाळांनी सुट्यांची यादी पालकांना पाठविली आहे. या शासकीय सुट्या बॅंकांसह सर्वच शासकीय विभागांसाठी लागू असणार आहेत. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू असल्याने अतिवृष्टी काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारातून देखील शाळांना सुट्या दिल्या जात आहेत. School Holidays List

सरकारने कर्मचाऱ्यांना दिला मोठा दिलासा, 7500 ऐवजी आता दरमहा मिळणार

25000 रुपये पेन्शन

 

अशी आहे सुट्यांची यादी :-

मोहरम (२९ जुलै), स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), पारशी नववर्ष (१६ ऑगस्ट), रक्षाबंधन (३० ऑगस्ट), शिक्षक दिन (५ सप्टेंबर), गणेश चतुर्थी (१९ सप्टेंबर), गौरी पूजन (२१ व २२ सप्टेंबर), अनंत चतुर्थदर्शी व ईद-ए-मिलाद (२८ सप्टेंबर), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर), घटस्थापना (१५ ऑक्टोबर), दसरा (२४ ऑक्टोबर), दिवाळी सुट्टी (९ ते २५ नोव्हेंबर), गुरूनानक जयंती (२७ नोव्हेंबर), ख्रिसमस (२५ डिसेंबर), नवीन वर्ष (३१ डिसेंबर ते १ जानेवारी), हुतात्मा दिन (१२ जानेवारी), भोगी, मकरसंक्रांत (१५ व १५ जानेवारी), प्रजासत्ताक दिन (२६ जानेवारी), श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती (१९ फेब्रुवारी), महाशिवरात्री (८ मार्च), धूलिवंदन (२५ मार्च), गुड फ्रायडे (२९ मार्च), रंगपंचमी (३० मार्च), गुढीपाडवा (९ एप्रिल), रमझान ईद (१० एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल), श्री रामनवमी (१७ एप्रिल), महावीर जयंती (२१ एप्रिल) व महाराष्ट्र दिन (१ मे).

शेतकऱ्याचा देसी जुगाड पाहून सगळेच थक्क, ट्रॅक्टरमध्ये असे बदल केले की बघतच राहिले लोक.. एकदा व्हिडिओ पहाच..!

उन्हाळा सुटी ४४ दिवसांची

२०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा शेवट १ मे रोजी होईल. त्यानंतर १४ जूनपर्यंत शाळांना उन्हाळा सुटी असते.

१५ जूनपासून पुढील शैक्षणिक वर्षाची सुरवात होणार आहे.

या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना तथा शाळांना ४४ दिवसांची उन्हाळा सुटी असणार आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!