Video हरियाणातील गुरुग्राममध्ये भीषण अपघातात एका बाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. कार चुकीच्या बाजूने (राँग साईड) ने येत असल्याचा बाईकस्वाराला अंदाज आला नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन कार चालकाला ताब्यात घेतलं आहे. या अपघाताच्या घटनेचा धडकी भरवणारा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अक्षत गर्ग असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो द्वारका येथील पोचनपूर येथील रहिवासी होता. अक्षत आपल्या बाईकने वेगाने जात होता. मात्र अचानक समोर आलेल्या कारला त्याची बाईक धडकली. अपघाताच्या वेळी अक्षत गर्गचे मित्रही दुचाकीवर मागे होते. त्यांनी अक्षत गर्गचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
कुलदीप कुमार ठाकूर असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप कुमार ठाकूर हा घिटोरणी येथील रहिवासी असून तो एका पीआर कंपनीचा सहसंस्थापक आहे. कुलदीप ठाकूर हा अनेकदा चुकीच्या बाजूने वाहन चालवत रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे देखील समोर आले आहे. त्याचे अनेक वेळा वाहतूक विभागाने दंड देखील बजावला आहे.