ट्रेंडिंग

Viral Bappa Song : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ ‘या’ प्रचंड व्हायरल झालेल्या गाण्याची संपूर्ण स्टोरी

Viral Bappa Song : ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ ‘या’ प्रचंड व्हायरल झालेल्या गाण्याची संपूर्ण स्टोरी

Viral Bappa Song : सध्या एका चिमुकल्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ (Viral Bappa Song) घातला आहे. ‘आमच्या पप्पांनी गणपती आणलाय’ असं गाण गात गोड हावभाव करणारा हा चिमुरडा इन्स्टाग्रामवर प्रचंड फेमस झाला आहे. साईराज गणेश केंद्रे असं या लहानग्याचं नाव आहे. साईराजचा व्हिडिओ व्हायरल होताच राज्यभरातून अनेक जणांनी साईराजच्या घरी जाऊन भेट दिली आहे. यासोबतच नेते मंडळींनाही या चिमुकल्याने भुरळ घातली आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत या गाण्यामागची संपूर्ण स्टोरी…

👇👇👇👇

जनधन खाते असेल तर महिन्यला मिळणार 3000 हजार रुपये

इथे यादी चेक करा

‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणे मनोज घोरपडे (मु. चरली वडा, पो. राहनाळ, ता. भिवंडी, जि. ठाणे) यांनी लिहिले.

भिवंडीत वडापावचा गाडा लावून ते आपला उदरनिर्वाह भागवतात. 2022 मध्ये त्यांनी गाडा चालवत असतानाच ‘ गरबा

नाचायला आली मम्मीच्या संगे ’ हे गाणे लिहिले.

ते गाण्यासाठी मोठ्या सेलिब्रिटींऐवजी आपलीच चार वर्षांची शौर्या आणि 7 वर्षांच्या माउलीला पुढे केले. त्यांना गायनाची एक

तालीम करून दाखवली आणि या चिमुकल्या भावंडांनी ते गाऊन वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला.

त्यानंतर 2022 सालीच गणेशोत्सवाच्या वेळी ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला..’ हे गाणे लिहिले. शौर्या आणि माउली घोरपडे

यांनी ते गायले. परंतु, वर्षभर त्याची फारशी प्रसिद्धी झाली नाही.

फक्त एका गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी

👇👇👇

येथे क्लिक करामोबाईलवर पहा

 

आता अचानक हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळले आहे. चिमुकल्यांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच या गाण्याने वेड लावले आहे. त्याला कारण ठरलाय केंद्रेवाडी (ता. परळी, जि. बीड) येथील साईराज केंद्रे हा अवघ्या चार वर्षांचा चिमुकला. शाळेच्या गणवेशात त्याने या गाण्यावर केलेला अभिनय सध्या प्रत्येकाच्या मनात बसला आहे.

इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप या सर्व ठिकाणी त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. राज्यभरात साईराजच्या अभिनयाने लोकांना भुरळ घातली आहे. तो सध्या सर्वत्र फेमस झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!