Cotton Rate Maharashtra शेतकऱ्यांसाठी खुशखबर….! कांदा, टोमॅटोपाठोपाठ कापूस बाजारातही आली तेजी, राज्यातील ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी भाव, पहा….
Cotton Rate Maharashtra शेतकऱ्यांसाठी खुशखबर….! कांदा, टोमॅटोपाठोपाठ कापूस बाजारातही आली तेजी, राज्यातील ‘या’ बाजारात मिळाला विक्रमी भाव, पहा….
👇👇👇👇
या अगोदर थोडंच वाचा पण महत्त्वाच वाचा..
PM Kisan 14th installment शेतकऱ्यांच्या खात्यात 14 हप्ता जमा झाला नसेल तर हे छोटसं काम करा लगेच जमा होणार पैसे
👇👇👇👇
ज्यांना कोणीही कर्ज देत नाही, त्यांना येथे त्वरित कर्ज मिळते
Cotton Rate Maharashtra : कापसाचा हंगाम आता जवळपास संपत आला आहे. काही भागात बाजार समितीतील
कापूस खरेदीही ठप्प झाली आहे. काही ठिकाणी येत्या काही दिवसांत खरेदी बंद होणार आहे. काही बाजारात कापूस
खरेदीसाठी वाढ देण्यात आली आहे.
येत्या चार ते पाच दिवसांत कापसाचा हंगाम संपणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. परभणी जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न
बाजार समितीने कापूस खरेदीसाठी १९ ऑगस्टची मुदत दिली आहे. म्हणजेच येत्या शनिवारपर्यंत या बाजार समितीत कापूस
खरेदी सुरू राहणार आहे. त्यानंतर या बाजारातील कापूस खरेदी बंद होणार आहे.
मात्र, कापसाच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे. कापूस हंगाम संपुष्टात येत असतानाच कापसाचे बाजारभाव वाढत
असल्याने शेवटी गोडधोड होणार असल्याचे बोलले जात आहे. कापूस खरेदी अंतिम टप्प्यात असताना सेलू एपीएमसीमध्ये कापसाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
👇👇👇👇
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 ऑगस्ट रोजी कापसाचा बाजारभाव 7435 ते 7835 रुपये प्रतिक्विंटल होता, तर सरासरी भाव 7825 रुपये होता, तसेच शुक्रवारी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी कापसाची आवक झाली. कापसाचा किमान भाव प्रतिक्विंटल 7725 ते कमाल 7800 रुपये, तर सरासरी भाव 7780 रुपये होता.
तसेच गुरुवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी 1212 क्विंटल कापसाची आवक झाली असून प्रतिक्विंटल किमान भाव 7640 ते 7765 रुपये तर सरासरी भाव 7725 रुपये होता. एकूणच आता कापसाचा बाजारभाव 8000 रुपयांच्या दिशेने जात आहे.
त्यामुळे कापूस हंगाम सुरू असताना सेलू एपीएमसीमध्ये कापसाचा भाव 9500 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला होता. मुहूर्तावर कापसाला विक्रमी भाव मिळाला, त्यामुळे संपूर्ण हंगामात कापसाला चांगला भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र या दरम्यान कापसाचे भाव बऱ्यापैकी खाली आले आहेत. सात हजार रुपये क्विंटलपेक्षा कमी दराने कापूस विकावा लागला.
काही दिवसांपूर्वी कापसाला काही बाजारात अवघा ६,००० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल असा कमी भाव मिळाला होता. मात्र आता अंतिम टप्प्यात भावात वाढ होत असून कापूस आठ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दिशेने जाऊ लागला आहे. मात्र, याचा फायदा फारच कमी शेतकऱ्यांना होणार आहे.