Fertilizer Rates : सर्व खतांचे नवीन दर जाहीर; खत अनुदानात वाढ
Fertilizer Rates : केंद्र सरकारनं खरिप हंगाम 2023 साठी P&K (फॉस्फेट आणि पोटॅश) खतांसाठीचं अनुदान जाहीर केलं आहे. 1 एप्रिल 2023 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान हे अनुदान लागू असणार आहे. खतांचे दर वाढवण्यात येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याचा अर्थ सध्या ज्या किंमतीला खत शेतकऱ्यांना मिळत आहेत, त्याच किंमतीला ते मिळणार आहे. त्यामुळे खतांचे सध्याचे दर किती आहेत ते जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. भारतात सर्वाधिक वापर यूरिया या खताचा केला जातो. सगळ्या खत उत्पादक कंपन्यांची यूरियाची 45 किलोची एक बॅग शेतकऱ्यांना 266 रुपयांनाच मिळत आहे. तर 50 किलोची बॅग 295 रुपयांना मिळत आहे. डीएपी खताची 50 किलोची एक बॅग साधारणपणे 1350 रुपयांना मिळत आहे.
👇👇👇👇
विदर्भ, मराठवाडा, खानदेशात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
एमओपी खताची किंमत :-
कोरोमंडल – 1700 रुपये
इंडियन पोटॅश लिमिटेड – 1700 रुपये
महाधन – 1780 रुपये
कृभको -875 रुपये
झुआरी – 875 रुपये
खताचा ग्रेड आणि कंपनीनुसार, 50 किलोच्या एका बॅगची किंमत पुढीलप्रमाणे –
1) खताचा ग्रेड – NPK-10:26:26
इफ्को – 1470 रुपये
महाधन – 1470 रुपये
कोरोमंडल – 1470 रुपये
राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड – 1470 रुपये
2) खताचा ग्रेड – NPS-20-20-0-13
कोरोमंडल – 1200 रुपये
इफ्को – 1200 रुपये
महाधन – 1300 रुपये
ग्रीनस्टार – 1275 रुपये
3) खताचा ग्रेड – NPK-12-32-16