या जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टी मंजूर पहा कोणती जिल्हे पात्र आहेत ते |Ativrushti nuksaan bharpai

या जिल्ह्यात अवकाळी अतिवृष्टी मंजूर पहा कोणती जिल्हे पात्र आहेत ते |Ativrushti nuksaan bharpai 

Ativrushti nuksaan bharpai अतिवृष्टी, पूर आणि चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास, शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रत्येक हंगामात एकदा इनपुट अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळते. ही मदत पुढील हंगामात शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहे. याशिवाय, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून इतर मंजूर बाबींसाठी विनिर्दिष्ट दराने मदत दिली जाते.

राज्यातील विविध नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीमध्ये मदत देण्यासाठी 1 नोव्हेंबर 2022 पासून राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे सुधारित दर आणि नियम 27 मार्च 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.

👇👇👇👇👇

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार तब्बल 352 कोटींचा पिक विमा

 

राज्यात मार्च ते एप्रिल 2023 या कालावधीत अवकाळी पाऊस पडला, ज्यामुळे प्रमुख कृषी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. राज्य सरकारने अवकाळी पाऊस आपत्ती म्हणून घोषित केला आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान 33% पेक्षा जास्त आहे ते इनपुट अनुदानाच्या स्वरूपात मदतीसाठी पात्र आहेत. हे अनुदान बाधित क्षेत्रासाठी 02 हेक्टरपर्यंत मर्यादित विहित दराने दिले जाते

👇👇

ट्रॅक्टर ट्रॅक्टर योजना यांना मिळणार 100% अनुदान ,

गावानुसार याद्या जाहीर

मार्च 2023 दिनांक 10 एप्रिल 2023. 21 एप्रिल 2023, 17 मे 2023 आणि 05 जून 2023 या कालावधीत

राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे आणि इतर नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचे

आवश्यक आदेश शासनाने जारी केले आहेत. विभागीय आयुक्त, अमरावती यांनी एप्रिल 2023 आणि

मे 2023 मध्ये पीक नुकसान निधी मागणी प्रस्ताव सादर केले असून, त्यांना निधी वितरीत करण्यास

मान्यता देण्यात आली आहे.

एकूण रु. 2286.43 लाख रुपये शासनाने मंजूर केले आहेत. एप्रिल 2023 ते मे 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या लोकांना दिलासा देण्यासाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. शासन निर्णयानुसार मदतीचा दर निश्चित केला जाईल. अधिक माहितीसाठी शासन निर्णय येथे पहा.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!