या नागरिकांसाठी सरकार बांधणार 1 लाख घरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा..! Government scheme..|

 

 

 

 

 

 

Government scheme सर्वांसाठी घर’ ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरणात परवडणारी, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ घरे उभारली जाणार आहे. सुधारित नवीन धोरण महिन्याभरात तयार करण्यात येणार असून यात ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे धोरण राबविले जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

 

 

 

👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻

 

शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माण विभागाचा आढावा घेण्यात आला. यावेळी गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह, धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिम गुप्ता, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर उपस्थित होते. नागरिकांना म्हाडा, तसेच गृहनिर्माण योजनांचा सहज लाभ घेता यावा यासाठी ऑनलाईन प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आदेश शिंदे यांनी यावेळी दिले. ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. नवीन धोरणानुसार विद्यार्थी वसतिगृह, नोकरदार महिलांसाठी वसतिगृह, कामगारांसाठी घरे, भाडेतत्त्वावरील गृहसंकुले, पुनर्विकास, पर्यावरणपूरक घरे, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आधारित घरे बांधण्यावर भर देण्यात येईल. गिरणी कामगारांसाठी एक लाख घरे बांधली जाणार असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जे कामगार गावी स्थलांतरीत झाले आहेत. त्यांना गावी घर देता येईल का याची चाचपणी केली जाणार आहे. मुंबई झोपडपट्टी मुक्त करण्यासाठी ऱखडलेले प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी

 

👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!