ट्रेंडिंग

मोठी बातमी या विभागात होणार साडेबारा हजार पदभरती

State Governments Recruitment 2024:आदिवासी विभागातील विविध संवर्गातील रखडलेल्या भरतीप्रक्रियेला मुहूर्त सापडला असून, साडेबारा हजार पदांच्या भरतीसाठी लवकरच प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत विनाविलंब भरतीप्रक्रिया राबविण्यात यावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.

राज्यात आदिवासींसाठी राखीव मात्र बिगर आदिवासींनी बळकावल्याचा आरोप असलेल्या पदांची भरती रखडली होती. अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचे आदेश २१ डिसेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते. या अधिकारी,

कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केल्यामुळे अनुसूचित जमातीची रिक्त झालेल्या पदांसाठी संबंधित विभागांनी कालबद्ध कार्यक्रम आखून विशेष भरती मोहीम राबवायची होती.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतील पदे भरण्याची कार्यवाही ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करायची होती. तसेच गट ‘क’ व गट ‘ड’मधील पदे भरण्याची कार्यवाही ३१ जुलै २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश १४ डिसेंबर २०२२ रोजी देण्यात आले होते. मात्र दीड वर्षे उलटले तरी विशेष भरती मोहीम राबविण्यात आलेली नव्हती. आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर शासनाने पदभरतीचे आदेश दिले.

महत्त्वाची माहिती पाण्यासाठी येथे क्लिक करून पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!