cottan rate : कापसाला सात ते साडेसात हजारांचा दरच मिळण्याची शक्यता ; कारण जाणून घ्या..

cottan rate : कापसाला सात ते साडेसात हजारांचा दरच मिळण्याची शक्यता ; कारण जाणून घ्या..
cottan rate :नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस बाजार भावाबद्दल माहिती पाहणार आहोत तर येणाऱ्या काळात कापसाला किती भाव राहील व कोणत्या कार्यामुळे जास्त भाव राहू शकत नाही ही सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत24 सप्टेंबर 2023.
👇👇👇👇
या लोकांचे बँक खाते होणार बंद तात्काळ करा हे काम ;
RBI चा मोठा निर्णय
यावर्षी पावसाचे उशिरा आगमन झाल्यामुळे पेरण्या उशिरा झाल्या. जूनमध्ये पेरणी केल्यानंतर जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे खरिपाची पेरणी झाली. तसेच ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाच्या उत्पादनात 30 ते 40 टक्के कपात होणार आहे.
दरम्यान, गतवर्षी सुरुवातीला कापसाला चांगला भाव मिळाला होता. मात्र कापसाला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला होता. त्यामुळे यंदा कापसाच्या भावाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, बागायती कपाशीसह जिरायती पिकांना सात ते साडेसात हजाराचा दर मिळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ८७ टक्के पाऊस झाल्याने आगामी रब्बी हंगामात चांगले उत्पादन होण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. गेल्या वर्षीच्या खराब हंगामात (२०२२) कापसाचे उत्पादन चांगले होते. त्यावेळी 2021 प्रमाणे कापसाला दहा ते तेरा हजारांचा दर मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाची मागणी आणि भाव लक्षात घेता कापसाला साडेसात ते आठ हजार भाव मिळाला.
हे महत्त्वाचे वाचा
केंद्राकडून शेतकऱ्यांवर गिफ्टचा वर्षाव; गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘या’ 4 मोठ्या योजनांची घोषणा
यंदाच्या हंगामात खरीपमधील कापूस उत्पादनाप्रमाणे बागायती कापूस चाळीस टक्के क्षेत्रावर आहे.
त्याची गुणवत्ता चांगली आहे. कोरडवाहू कापसाने साठ टक्के क्षेत्र व्यापले आहे. पावसाअभावी त्याची वाढ
अद्याप पूर्ण झालेली नाही. त्याचे उत्पादन नवरात्रोत्सवात येणे अपेक्षित होते. पण डिसेंबरमध्ये येईल.
दसरा-दिवाळीच्या काळात बागायती कापूस बाजारात विकला जाईल. त्याला सध्याचा सात ते साडेसात
हजाराचा दर मिळेल. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी अजून वाढलेली नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी काही महिन्यांत 60 हजारांवर गेल्यास कापसाच्या
भावातच वाढ होईल, असे चित्र आहे.