Onion Rate Maharashtra  : सप्टेंबर महिन्यात खरंच कांद्याचे भाव 5000 होणार का ? बाजार अभ्यासकांनी एकाच शब्दात दिलं उत्तर

Onion Rate Maharashtra  : सप्टेंबर महिन्यात खरंच कांद्याचे भाव 5000 होणार का ? बाजार अभ्यासकांनी एकाच शब्दात दिलं उत्तर

Onion Rate Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात टोमॅटोची चर्चा पाहायला मिळत आहे. टोमॅटोच्या बाजारभावात विक्रमी वाढ झाल्याने सर्वत्र टोमॅटोच्या बाजारभावाची चर्चा होती. टोमॅटोचा बाजारभाव 200 रुपये किलोवर पोहोचला होता.

👇👇👇👇

पीक विमा मजूर यादी

मध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट बिघडले. त्यामुळे सर्वत्र टोमॅटोची चर्चा रंगली होती. मात्र टोमॅटोचे हे वादळ शमले आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या दरात घसरण होत आहे. मात्र, कांद्याच्या बाजारभावाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात विक्रमी वाढ होत असल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून कवडीमोल भावाने कांद्याची विक्री सुरू आहे. राज्यातील अनेक महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचा सरासरी बाजारभाव 2300 रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचला आहे.

👇👇👇👇
एस टी ची हाफ तिकीट योजना बंद होणार..? योजनेचा नियमात मोठा बदल; लगेच पहा पूर्ण माहिती

 

काही बाजारपेठांमध्ये कांद्याचा सरासरी बाजारभाव प्रति क्विंटल 2000 रुपयांहून अधिक झाला आहे.

विशेष म्हणजे किरकोळ बाजारात कांदा चाळीस रुपये किलोपेक्षा जास्त दराने विकला जात आहे. तसेच,

पुढील महिन्यात किरकोळ बाजारात कांदा ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जाईल, असा दावा

काही दिवसांपूर्वी एका अहवालात करण्यात आला होता.

त्यामुळे घाऊक बाजारातही भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, नाफेडने बफर स्टॉकमधील कांदा

खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी

दिसून आली. शेतकऱ्यांची नाराजी पाहून केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी नाफेड गरज

असलेल्या राज्यांमध्ये कांद्याची विक्री करणार असल्याचे स्पष्ट केले.

सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर कांद्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. मात्र भावात घट झालेली नाही.

दरम्यान, नाफेड 3 लाख मेट्रिक टन कांदा खुल्या बाजारात विकणार आहे. मात्र, देशाला दररोज ५० हजार

टन कांद्याची गरज आहे. म्हणजे नाफेडचा कांदा फक्त सहा दिवस टिकणार आहे. यामुळे नाफेडने खुल्या बाजारात कांदा विकला तरी त्याचा बाजारभावावर फारसा परिणाम होणार नाही.

प्रत्यक्षात रब्बी हंगामातील कांद्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा मोठा फटका बसला. त्यामुळे रब्बी कांद्याचा दर्जा घसरला आहे. पावसात सापडलेला हा कांदा जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे यंदा रब्बी हंगामातील कांद्याची आवक सुमारे एक ते दीड महिन्यांनी घटणार आहे. दरवर्षी सप्टेंबरनंतर कांद्याची आवक कमी होते. यंदा मात्र ऑगस्ट महिन्यापासून कांद्याची आवक कमी होत आहे.

याशिवाय मान्सूनला उशीर झाल्याने खरीप हंगामातील कांदाही एक महिना उशिराने बाजारात येणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस बाजारातील ही तेजी कायम राहणार आहे. तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत कांद्याची वाढलेली मागणी, घटलेला पुरवठा आणि बांगलादेशातून वाढती मागणी या पार्श्वभूमीवर कांद्याच्या दरवाढीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात बाजारभावात आणखी वाढ होण्याची शक्यता असून घाऊक बाजारात कांद्याला क्विंटलमागे ३ हजार ते ४ हजार रुपये भाव मिळू शकतो, असा दावा केला जात आहे. ऑक्‍टोबरनंतर खरीप हंगामातील कांदा बाजारात येईल, मात्र पावसाची ही खराब स्थिती पाहता खरीप हंगामातील कांद्याचा बाजारावर फारसा विपरीत परिणाम होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

रेशन कार्ड नवीन नियम येथे क्लिक करून पहा.👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लिक करून आधार कार्ड च्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या..👈🏻👈🏻👈🏻

Leave a Comment

Close Visit agrinews24tas

error: Content is protected !!