pik vima महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांमध्ये खरीप हंगामात पावसाचा खंड आणि विविध नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी राज्य सरकारने पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत २४ जिल्ह्यातील सुमारे ५२ लाख शेतकऱ्यांना २२२१६ कोटी रुपयांचा अग्रीम पीकविमा मंजूर केला आहे. ही माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.