Aditya Birla capital scholarship : पहिली ते पदवीधरच्या विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये पर्यंत कॉलरशिप चा लाभ
Aditya Birla capital scholarship : पहिली ते पदवीधरच्या विद्यार्थ्यांना मिळणार 60 हजार रुपये पर्यंत कॉलरशिप चा लाभ
Aditya Birla capital scholarship चा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी आणि शर्ती तसेच इतर महत्त्वाच्या बाबी पुढे दिलेल्या आहेत.
इयत्ता पहिली पासून ते पदवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशन यांच्यातर्फे दिली जाणारी स्कॉलरशिप आहे. Aditya Birla capital scholarship या शिष्यवृत्ती चा लाभ घेण्यासाठी 2023-24 करिता पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबी मध्ये मदत व्हावी या हेतूने 60,000/- रुपयांपर्यंत रक्कम दिली जाते.
🛑 आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप च्या अटी
◾विद्यार्थ्याने मागील इयत्ता मध्ये 60 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविलेले असावेत.
◾कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.
◾आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड आणि त्यांच्या इतर कंपनीमधील कर्मचाऱ्यांचे मुले मुली या स्कॉलरशिप करिता पात्र नाहीत.
🛑 आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप चा किती मिळणार लाभ ?
◾इयत्ता पहिली ते आठवी – 18,000/- रुपये
◾इयत्ता नववी ते बारावी – 24,000/- रुपये
◾पदवी – 36,000/- रुपये
आवश्यक दस्तऐवज
◾ओळखपत्र (आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स)
◾पासपोर्ट साईज फोटो
◾मागील वर्गाचे मार्कशीट
◾चालू वर्षांमध्ये पुढील इयत्ता मध्ये प्रवेश घेतल्याचा पुरावा ( फीस भरलेली पावती, प्रवेश पत्र, विद्यार्थी ओळखपत्र आणि बोनाफाईड सर्टिफिकेट)
◾बँक अकाउंट पासबुक
◾कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला
🧑💻 ऑनलाईन अर्ज येथे अर्ज करा
🌐 अधिकृत संकेतस्थळ येथे क्लिक करा
🛑 आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप करिता अर्ज कसा करावा ?
◾सर्वात प्रथम आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
◾स्कॉलरशिप साठी Apply Now या बटनावर क्लिक करा.
◾लॉग इन केल्यानंतर आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप 2023-24 करिता एप्लीकेशन फॉर्म च्या पेजवर उघडल्यावर Start Application या बटनावर क्लिक करा.
◾तुमची आवश्यक पूर्ण माहिती भरा. कागदपत्रे अपलोड करा Terms and conditions वर टिक करा.
◾तुम्ही फॉर्म बरोबर भरला आहे का याची खात्री करा आणि त्यांनतर तुम्ही Submit बटणावर क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण होईल.
🛑 आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप करिता निवड कशी होणार
◾विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थिती व गुणानुसार निवड तसेच दस्तऐवज तपासणी दूरध्वनीद्वारे घेतलेली मुलाखत आदित्य बिर्ला कॅपिटल स्कॉलरशिप फाउंडेशन कडून निवड केली जाणार आहे.
◾स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2023 ही आहे.
◾स्कॉलरशिप चे लेटेस्ट अपडेट व वेळापत्रकासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाईटला भेट देत राहावी.