Loan Waiver Scheme : आता याच शेतकऱ्यांना मिळणार ५०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान
Loan Waiver Scheme : आता याच शेतकऱ्यांना मिळणार ५०,००० रुपये प्रोत्साहनपर अनुदान
Loan Waiver Scheme: शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी नियमितपणे कर्ज भरतात त्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळत नसल्याचे आपण पाहत आहोत. यासंदर्भात राज्याचे नवे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले की, नियमात बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच आता प्रोत्साहनपर अनुदान दिले जाईल. मंगळवारी (15 ऑगस्ट) कोल्हापुरात त्यांनी ध्वजारोहण केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार म्हणाले, “जे शेतकरी 3 वर्षे नियमितपणे कर्जाची परतफेड करतात. त्यांना शासन अनुदान देते. आणि जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी निधीची कमतरता होती.
👇👇👇👇
मराठवाड्यातल्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास 60 हजार कोटींची तरतूद – मुख्यमंत्री
त्यासाठी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. ते मंजूर झाल्याने नियमात बसणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. अर्थमंत्री म्हणून मी हे स्पष्ट करू इच्छितो. राज्यातील शेतकऱ्यांचे वीजबिल भरण्यासाठी कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने शेतकरी नाराज आहेत. त्यावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज जोडणी कापली गेल्यास मी त्याबाबत ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलेन. कर्जमाफी योजना