NABARD Dairy Farming Subsidy Schemes : गाय गोठ्यासाठी मिळणार 77 हजार रुपये अनुदान वाटप सुरू 1 दिवसात बँक खात्यात जमा
NABARD Dairy Farming Subsidy Schemes : गाय गोठ्यासाठी मिळणार 77 हजार रुपये अनुदान वाटप सुरू 1 दिवसात बँक खात्यात जमा
👇👇👇👇
येथे क्लिक करून पहा कसा करावा ऑनलाइन अर्ज
राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदरची योजना राज्यात सन २०२३ २४ या आर्थिक वर्षापासुन राबविण्यात यावी.
योजनेचे आर्थिक निकष
या योजने अंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यास ०२ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट ५० टक्के अनुदानावर तर अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना ७५ टक्के अनुदानावर वाटप करण्यात यावा. या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास दुधाळ जनावरांसाठी गोठा बांधकाम, कडबाकुट्टी यंत्राचा पुरवठा व खाद्य साठवणुक शेड बांधकाम या बाबींसाठी कोणतेही अनुदान देय राहणार नाही. सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित ५० टक्के रक्कम तसेच, अनुसूचित जाती / आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वतः अथवा बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल.
गाय गोठा अनुदान योजनेसाठी फॉर्म कसा भरायचा ?
➡️ गाय गोठा अनुदान योजनेचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीने आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात भरायचा आहे.
गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन पक्षी मिळणार आहेत का ?
➡️ गाय गोठा अनुदान योजनेत कुक्कुटपालन शेडसाठी अनुदान मिळेल परंतु पक्षी हे स्वतः शेतकऱ्यांनी घ्यावेत.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची सुरुवात केव्हा झाली ?
➡️ शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेची सुरुवात ३ फेब्रुवारी २०२१ पासून झाली आहे.
👇👇👇👇
येथे क्लिक करून पहा कसा करावा ऑनलाइन अर्ज
लाभार्थी निवडीचे निकष
सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच, अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकांवरून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात यावी.
महिला बचत गटातील लाभार्थी (खालील अ. क्र. २ व ३ मधील)
अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यंतचे भूधारक)
सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.
या योजनेंतर्गत लाभ दिलेल्या लाभार्थीस पुन्हा सदर योजनेचा लाभ देण्यात येऊ नये.
या योजनेमध्ये प्रतिदिन १० ते १२ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या एच एफ, जर्सी या संकरित गायी, प्रतिदिन ८ ते १० लिटर दुध उत्पादन देणाऱ्या गीर, सहीवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर, प्रति दिन ५ ते ७ लिटर दुध उत्पादन देणाऱ्या देवणी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी गायी तसेच, मुन्हा व जाफराबादी या सुधारित जातीच्या म्हशी वाटप कराव्यात. वाटप करावयाची दूधाळ जनावरे ही शक्यतो १-२ महिन्यांपूर्वी व्यालेली दुसन्या / तिसऱ्या वेतातील असावीत. Animal Husbandry