ट्रेंडिंग

nuksan bharpai :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केला निधी, पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

nuksan bharpai :नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केला निधी, पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केला निधी, पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केला निधी, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार निधी | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केला निधी, पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार
अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे खरीप पिके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे.

 

अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणार मोफत गाय व म्हैस असा करा अर्ज.

 

nuksan bharpai : पावसाळ्याच्या सुरुवातीला अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे खरीप पिके आणि शेतजमिनीच्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली आहे. अमरावती विभागातील पाच आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून डीबीटीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

यावर्षी जून व जुलै महिन्यात बुलढाणा, हिंगोली, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे पाणी तुंबले होते. पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा तडाखा बसला. यामध्ये शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे शेतजमिनी वाहून गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत केली जाईल.

त्या अगोदर थोडस पण महत्त्वाचं वाचा.

Online land record :- घरबसल्या पहा 1880 साल पासूनचे सातबारा, फेरफार आणि खाते उतारे! तेही तुमच्या मोबाईल वरती;

nuksan bharpai दरम्यान, 11 जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना 1071 कोटी 77 लाख 1 हजार रुपयांची मदत वाटप करण्यात येणार असून अमरावती विभागातील 7 लाख 63 हजार आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील 6 लाख 46 हजार शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.

या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना निधी वितरित केला जाणार आहे
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशीम जिल्ह्यांतील आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर या जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

‘या’ पदे आहेत
२४ तासांत ६५ मिमीपेक्षा जास्त पावसामुळे ३३ टक्क्यांहून अधिक पिकांचे नुकसान झालेल्या

मंडळातील शेतकऱ्यांना ही मदत लागू होणार आहे. ज्या मंडळांमध्ये केवळ पूर आहे, तेथे अतिवृष्टीचा निकष

लागू होत नाही आणि अशा शेतकऱ्यांना मदत मिळणार नाही. त्याचबरोबर राज्य सरकारने

पिकांच्या नुकसानीसाठी दिलेल्या निधीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या निधीचा लाभ मिळणार नाही.

ही मदत लहान जमीनधारक शेतकऱ्यांना मान्य आहे आणि संबंधित अधिकाऱ्याने शेतजमिनीचे नुकसान

झाल्याचे प्रमाणित करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!